Saturday, December 26, 2020
आता असे करूया
Friday, December 25, 2020
कहां हो तुम
Friday, December 18, 2020
वृत्त - उध्दव
Wednesday, December 16, 2020
वृत्त - मध्यरजनी
Sunday, December 13, 2020
वृत्त - भुजंगप्रयात
Tuesday, December 08, 2020
वृत्त - केशवकरणी
Saturday, December 05, 2020
वृत्त - हरिभगिनी
Tuesday, December 01, 2020
वृत्त - हिरण्यकेशी
Monday, November 23, 2020
वृत्त - सौदामिनी
Monday, November 09, 2020
वृत्त - इंद्रवज्रा
Tuesday, November 03, 2020
भिन्न किती
Monday, October 26, 2020
वृत्त - कलिंदनंदिनी
Saturday, October 24, 2020
वृत्त - चंपकमाला
Monday, October 19, 2020
चांदणे
Thursday, October 15, 2020
प्रेमात तुझ्या
तुझ्या आठवांनी श्वासात भिनतो
तुझा गंध ओला नव्याने पुन्हा
प्रेमात पडतो नव्याने तुझ्या मी
गुन्हा तोच घडतो नव्याने पुन्हा
निराळीच असते तुझी भेट प्रत्येक
ऋतूंचे तुझ्या हे किती सोहळे
कसे साठवावे तुला अंतरी मी
तुझे रंग फुलती किती वेगळे
तुला ऐकताना हरखून जातो
तुझे लाघवी बोल छळती मला
म्हणतेस “नाही” भेटीस जेव्हा
तुझा शब्द खंजीर भासे मला
का मीच व्हावे आतूर इतके
अप्राप्य असतेस तू कैकदा
झुरावे कधी तू माझ्याविनाही
उतावीळ व्हावे कधी एकदा
✍जयश्री अंबासकर
Tuesday, October 13, 2020
यापुढे
आसवांचे
अर्घ्य मी देणार नाही यापुढे
वेदनांचा व्यर्थ हा बाजार नाही यापुढे
सतत जिंकावे असा नाहीच मजला सोस हा
जिंकले नाही तरी हरणार नाही यापुढे
भावनांशी खेळणे हे आजवर झाले किती
सांत्वनाचा नाटकी व्यापार नाही यापुढे
स्वाभिमाना अडगळीतच डांबणे झाले पुरे
ही अशी तडजोड मी करणार नाही यापुढे
मी स्वयंभू या जगा करणार आहे यापुढे
बापुडे लाचार जग दिसणार नाही यापुढे
जयश्री अंबासकर
२६ सप्टेंबर २०२०
Wednesday, October 07, 2020
पापणकाठी आसवदाटी
एकाच शब्दसमूहाला दोन वेगवेगळ्या बंधात दाखवण्याचा प्रयत्न !!
एक कविता आणि दुसरी गझल
पापणकाठी आसवदाटी
दुर्मिळ आता गाठीभेटी
सक्त दुरावा भीतीपोटी
बंधन मोठे छोट्या भेटी
पापणकाठी आसवदाटी
फक्त अता आभासी भेटी
आठवणीतच कर संतुष्टी
संपत आली आशा खोटी
पापणकाठी आसवदाटी
माणुस आता फक्त सोंगटी
भयभित चित्ती कोटी कोटी
नाव अता रे तुझेच ओठी
तारक आता तू जगजेठी
गझल
दुर्मिळ आता गाठीभेटी
पापणकाठी आसवदाटी
सक्त दुरावा भीतीपोटी
पापणकाठी आसवदाटी
बंधन मोठे छोट्या भेटी
पापणकाठी आसवदाटी
आठवणीतच कर संतुष्टी
पापणकाठी आसवदाटी
फक्त अता आभासी भेटी
पापणकाठी आसवदाटी
संपत आली आशा खोटी
पापणकाठी आसवदाटी
भयभित चित्ती कोटी कोटी
पापणकाठी आसवदाटी
माणुस फक्त पटावर गोटी
पापणकाठी आसवदाटी
तारक आता तू जगजेठी
पापणकाठी आसवदाटी
जयश्री अंबासकर
८ ऑक्टोबर २०२०
Tuesday, October 06, 2020
वृत्त - मंजुघोषा
वृत्त
– मंजुघोषा
गालगागा गालगागा गालगागा
सांगता होते दिसाची
सांज येता
सांजही जाते लयाला रात्र येता
चक्र
हे चाले निरंतर जीवनाचे
उगवतो
कोणी कुणाचा अस्त होता
खेळ
हा चालूच असतो जीवनाचा
एक
जातो एक येतो वेळ येता
थांबते
आयुष्य ना रेंगाळतेही
वेग
मंदावतहि
नाही दु:ख होता
अटळ
आहे खेळ हा जर माणसाला
खेळताना
का करावी व्यर्थ चिंता
सोपवू
कोणा सुकाणू प्रश्न नसतो
तोच
सांभाळी सुकाणू तोल जाता
जयश्री
अंबासकर
३
ऑक्टोबर २०२०
Friday, October 02, 2020
मुक्तीचा आभास किती
आयुष्याच्या
खेळपटावर
दु:खाचे आक्रोश किती
दान
सुखाला थोडे आणिक दु:खाला ते अधिक किती
आवरताना
मोह पसारा, उमगत जातो योग जरा
उपभोगातील
जिणे वाटते, आता सारे फोल किती
काळापुढती
चालत नाही, काही काही कोणाचे
भाग्यावरही
पाश तयाचा, सत्ता ही निष्ठूर किती
आसक्तीचा
देह मिळाला, आहे आम्हा सगळ्यांना
अडकत
असतो मोहातच पण, मुक्तीचा आभास किती
ऐहिक
सुख अन् ऐहिक इच्छा, गाठोडे भरते सगळे
भोगाने
आयुष्यच सरते, योगाला उरतेच किती
जयश्री
अंबासकर
Wednesday, September 30, 2020
Thursday, September 24, 2020
तू असताना...
मी
पाचोळा तू नसताना
मी
हिंदोळा तू असताना
पोक्त
विचारी तू नसताना
मी वय
सोळा तू असताना
दु:खद वास्तव तू नसताना
स्वप्ने
डोळा तू असताना
एकाकी
मी तू नसताना
गर्दी
गोळा तू असताना
डोळस
वावर तू नसताना
कानाडोळा
तू असताना
सावध
चौकस तू नसताना
गाफिल
भोळा तू असताना
जयश्री
अंबासकर
२४
सप्टेंबर
२०२०
Saturday, September 19, 2020
वृत्त मालिनी - सोहळे यामिनीचे
#गझलेतर वृत्तबद्ध कविता
वृत्त_मालिनी
लललल लल गागा | गालगा गालगागा
झुळ झुळ झुळ होता
वाहता गार वारा
सुखद उठत होता गारव्याने शहारा
विहरत ढग होते धुंद दाही दिशाही
नटुन
थटुन येण्या यामिनी वाट पाही
दिवस सरत जाता जाग येते नभाला
विहग परत जाती आपुल्या कोटराला
हळुच मधुर जाते
साद ती चांदण्याला
अधिर अधिर होते रात्र जागावयाला
टिपुर टिपुर होते रात्र कोजागिरीची
उधळण
अति होते अंबरी चांदण्यांची
धवल रुप जपावे अंतरी या शशीचे
फिरुन अनुभवावे सोहळे यामिनीचे
जयश्री अंबासकर
१९ सप्टेंबर २०२०
Sunday, September 13, 2020
निर्मळ जगणे जमेल ना
जगलो कायम ऋणात मी, ऋण हे माझे फिटेल ना
आनंदाने
कधी तरी, उपभोगाया मिळेल ना
धावत
आलो किती पुढे, कोणी न उरले सवे अता
मागे फिरता पुन्हा मला, साथी कोणी दिसेल ना
सोडून
गेली कशी मला, शोधू आई कुठे तुला
जगणे
दुष्कर तिच्या विना, आई फिरुनि दिसेल ना
दु:खी व्हावे किती मना, दु:ख बघावे किती पुन्हा
पुनरावृत्ती
नको नको, शेवट सुखकर असेल ना
आयुष्या
रे गणित तुझे, सोडवणे मज जमेल ना
तुकडे
सगळे जुळुनि तुझे, कोडे पुरते सुटेल ना
देवा
सुंदर तुझ्या परी, मजला हे जग दिसेल ना
झुळझुळ
पाण्या परी मला, निर्मळ जगणे जमेल ना
जयश्री अंबासकर
Friday, September 11, 2020
मध्यान्ही तप्त प्रहरी
एक गंमत... "मध्यान्ही तप्त प्रहरी" ही एकच ओळ कडव्याच्या वेगवेगळ्या ओळीत लिहून केलेली कविता !!
मध्यान्ही तप्त प्रहरी
ओसाड
पार सारे
बाहेर
नाही कोणी
बंदिस्त
आत सारे
सुनसान
हे मोहल्ले
मध्यान्ही तप्त प्रहरी
कामास
कोणत्याही
येईल
कोण दारी
दिसतो कुणी बिचारा
पसरूनिया
पथारी
मध्यान्ही तप्त प्रहरी
खाऊनिया
शिदोरी
उष्म्यास
या अघोरी
कंटाळतात
सारी
किती
काहिली जीवाची
मध्यान्ही तप्त प्रहरी
घामात
चिंब सारे
मध्यान्ही तप्त प्रहरी
तलखी
कशी शमावी
मध्यान्ही तप्त प्रहरी
मध्यान्ही
तप्त प्रहरी
वाराही
खूप शिणतो
मध्यान्ही
तप्त प्रहरी
वारा मुकाट
असतो
मध्यान्ही तप्त प्रहरी
धग सोसतात सारी
मनमानी सूर्य करतो
मध्यान्ही तप्त प्रहरी
जयश्री
अंबासकर
११.९.२०२०
Wednesday, September 09, 2020
भग्नता
ऐलतटावर भग्न उभा मी, पैलतटी तू तृप्त किती
विरहाने
उध्वस्त किती मी, मुक्तीने तू शांत किती
ओलावा जगण्याचा गेला, जगणे झाले शुष्क किती
आठवणींच्या पागोळ्यांतुन, जमवत आणू ओल किती
माहित
असते श्वास मला जर, उरले या देहात किती
संपवुनी
मी आलो असतो, सोपी होती भेट किती
माझे
मीच मला सावरतो, बसुनि उसासत राहु किती
थांबुन एका जागी केवळ, दु:ख उगाळू तेच किती
दु:खाने या दग्ध जरी मी, आयुष्याला वेग किती
थांबायाला
नाही फुरसत, जगण्याचा आवेग किती
जयश्री
अंबासकर
०९.०९.२०२०