Wednesday, August 23, 2006

हॉस्पीटल

मला हॉस्पीटल ह्या जागेबद्दल थोडंसं वावडंच आहे. पण त्यात काम करणाऱ्या डॉक्टरांबद्दल मात्र नितांत आदर आहे. सगळ्या लोकांचं आशास्थान असलेली ही वास्तू कोणालाच नावडावी हे ह्या वास्तूचं दुर्दैवच म्हणावं लागेल. अवीसोबत कुवेतमधल्या मोठ्या हॉस्पीटलमधे जायची एकदा वेळ आली. तिकडून घरी आल्यावर काहीतरी घालमेल व्हायला लागली आणि ही कविता उतरली.

तटस्थ इमारतीतली
अविरत धावपळ
पांढऱ्या रंगातली
लयबद्ध पळापळ
बाहेरची हिरवळ
मनातली पानगळ
प्रश्नार्थक चेहेरे
व्याकुळ मन
असहाय नजरा
पिडलेलं तन
उरातली धडधड
देहाची पडझड
व्याधींचं गाठोडं
थकलेलं शरीर
शोधतंय निवारा
एक छोटासा कोपरा
सांत्वनाची थाप
हसरा दिलासा
अगतिक डोळ्यांना
पेलणारा खुलासा

जयश्री

3 comments:

shashi said...

I don't know how to write in Marathi font but I am amazed by your blog..There are very few Marathi blogs and yours is the best...
Marathi kawita wachin khup diwas zale(shewatchi kawita 12th madhe wachli hoti).

जयश्री said...

शशी, मराठीतून लिहायचं असेल तर baraha.com वर जा आणि baraha 7.0 download कर. मग install केल्यावर तुला तुझ्या tool bar बर एक sign येईल. बरहा direct वर click केल्यानंतर तुला बऱ्याच भाषांचं option मिळेल. त्यात हिंदी/मराठी, unocode option select कर. मग तू F12 key दाबून toggle mode वर english मराठी लिहू शकशील.

तुझ्या इतक्या सुरेखभिप्रायाबद्दल मनापासून आभार.

जयश्री

hemant_surat said...

हॉस्पिटलवर एवढी चांगली कविता प्रथमच वाचतोय. साधारणत: हॉस्पिटल आणि कविता ह्या match न होण्यार्या गोष्टी. एक चांगले marriage तुम्ही घडवून आणले.

हेमंत_सूरत