Friday, February 02, 2007

तगमग

मन आतूर आतूर
त्याला कशाची ही भूल
काय बाई आज व्हावे
मन आतूर आतूर

ओठी सलज्ज कमान
हसू होई छान स्वार
वाट पाहतं कोणाची
मन आतूर आतूर

वारा बावरा छळतो
छेड उगाच काढतो
म्हणे जरा तू सावर
मन आतूर आतूर

गंध ओळखीचा येई
गूढ उकलून जाई
लोचनात का हे नीर
मन आतूर आतूर

पायरव येता कानी
खुळावतो जीव वेडा
दारी दिसता साजण
सडा घालतो मोगरा

आता मन हे अधीर
मन आधीर अधीर

जयश्री

6 comments:

Anonymous said...

कवितेला बहिणाबाईंच्या 'अरे संसार संसार' मधला नाद जाणवतोय. कविता उत्तम आहेच;पण शेवटच्या सहा ओळी...

पायरव येता कानी
खुळावतो जीव वेडा
दारी दिसता साजण
सडा घालतो मोगरा

आता मन हे अधीर
मन आधीर अधीर

इथे आगंतुक वाटतात.'मन आतूर आतूर' हे पालूपद छान आहे.ते वापरून त्यात सुधारणा नाही का करता येणार?

प्रमोद देव.

HAREKRISHNAJI said...

he tumchi duniya khupacha haasari, kavyabhari ani surekh aahe

HAREKRISHNAJI said...

Since "एक होता कार्व्हर" सगळ्यात आवडतं पुस्तक, written by Veena Gavankar, you may be interested in Organic food, fruits etc.

May I request you to visit
http://dailytiffin.blogspot.com/
and
http://ayurvedasanjeevani.blogspot.com/

जयश्री said...

harekrishnaji, अरे मी मेलमधून माझा response पाठवते रे! आणि मी तुझा इमेल पत्ता शोधत होते.....पण दिसला नाही म्हणून इथेच आभार मानते.
तुझा ब्लॉग बघितला....... खूप interesting वाटला.वेळ मिळाला की वाचून प्रतिक्रिया देईनच.
माझा अजून एक ब्लॉग आहे. वेळ झाला तर जरुर चक्कर टाक
https://jayavi.wordpress.com/

जयश्री

Vaishali Hinge said...

हाय गुरुजी, आज झाला शेवटी एकदाचा blog तयार, बघा आपल्या पसंतीस उतरतो का?

मन अधिर अधिर छाने लय...

HAREKRISHNAJI said...

harekrishnaji@yahoo.com