खरं सांगू का.... मला ना वर्तमानातच रमायला आवडतं. आता ठीक आहे पण पुढे काय होणार, असा विचार करणाऱ्या माणसांचा मला काहीसा रागही येतो. पुढे काय होणार ह्या विचाराने आताचा हा सुखाचा क्षण का वाया घालवायचा? शिवाय तुम्ही जर fighter असाल तर तुमच्या हिम्मतीवर तुम्ही नक्कीच तुमचं भविष्य सुखमय करु शकता. ही कविता अगदी typical माझ्या nature ची कविता आहे.
धुकं
धुक्यात हरवलेली वाट
सभोवती हिरवळ
पण पुढे अंधार दाट
कशाला हवी ती पर्वा
त्या पुढच्या काळोखाची
त्या गूढ भविष्याची
वर्तमानातल्या हिरवळीत
आसूसून नहावं
पाखरासारखं स्वच्छंद बागडावं
आपल्या हातानी भरावं
आपलं सुखाचं माप
धुकंही विरेल मग आपोआप
पुढची वाटही विचारेल मग
कुठे वळायचं
आता कुठल्या शिखरावर जायचं
जयश्री
धुकं
धुक्यात हरवलेली वाट
सभोवती हिरवळ
पण पुढे अंधार दाट
कशाला हवी ती पर्वा
त्या पुढच्या काळोखाची
त्या गूढ भविष्याची
वर्तमानातल्या हिरवळीत
आसूसून नहावं
पाखरासारखं स्वच्छंद बागडावं
आपल्या हातानी भरावं
आपलं सुखाचं माप
धुकंही विरेल मग आपोआप
पुढची वाटही विचारेल मग
कुठे वळायचं
आता कुठल्या शिखरावर जायचं
जयश्री
7 comments:
जयश्री,
कवितेचा आशय सुंदर आहे.
कशाला हवी ती पर्वा
त्या पुढच्या काळोखाची
त्या गूढ भविष्याची
विशेष आवडले. वर्तमानातील हिरवळ ही कल्पना सुरेख आहे.
शैलेश, मनापासून आभार. आत्ताच तुझाही ब्लॉग दिसला....आरामात वाचून कळवते तुला.
Nice poem.
But only easy to write. Tell me, do you really have any darkness ahead? Or you are happily living your life and have no worried of future?
फ़क्त लिहिणं खरंच सोपं आहे. पण माझ्याबद्दल सांगायचं झालं तर गणपतीच्या कृपेनी माझं आयुष्य इतकं छान सुरु आहे ना. तसही भविष्याची काळजी करणं माझ्या स्वभावात नाही. मी आजसाठी जगते.
Exactly, that was my point and I wanted to see how you reacted. If you never had a time when you had to worry about future, you will not understand why people do. The worrying nature "swabhAw" may come from harsh experiences.
Sorry to write reply on your reply, but just wanted to get this through.
Cheers.
तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे. पण माझं सुदैव आहे ते असंही म्हणू शकते.
agdi agdi........
malaa Dos paajaNaree kavitaa ga:))
aavaDalii
Post a Comment