एखादा दिवस असा उगवतो ना..........काही मनासारखं जमतंच नाही. सगळं विपरीतंच घडतं. सारखी चिडचिड स्वत:वर आणि समोर जो दिसेल त्याच्यावर.......... असंच काहीसं.....
एखादा दिवस असा उगवतो
मनाला चुटपुट लावून जातो
सारं काही उलटंच घडतं
आणि उभारलेलं मन कोलमडून पडतं
हरएक गोष्ट चुकतंच जाते
सावरायच्या आधीच विस्कटून जाते
सा-या जगाचा अगदी राग राग येतो
समोरचा प्रत्येक माणूस नकोसा होतो
मन कशातच रमत नाही
कुठल्याच गोष्टीत गमतही नाही
काळाकभिन्न अंधार वेडावू लागतो
मनातल्या काळोखाला अधिकच गडद करतो
सांजवेळीचा दिवाही धापा टाकू लागतो
भिंतीवरल्या सावल्यांशी असहाय झुंज देतो
रात्रीची चढती कमान आणखीनच रुंदावते
सा-या जगाला जणू विळख्यात घेऊ पहाते
थकलेलं मन मग स्वत:ला झोपेच्या स्वधीन करतं
आणि एका शुभ्र दिवसाची स्वप्नं पाहू लागतं.
1 comment:
होतं असं कधी कधी!प्रत्येकाला ह्या अनुभवाला सामोरं जावं लागतं;पण त्यावर कविता आपल्यासारखीच करू जाणे.कविता मस्त जमलेय!
रात्रीची चढती कमान आणखीनच रुंदावते
सा-या जगाला जणू विळख्यात घेऊ पहाते
थकलेलं मन मग स्वत:ला झोपेच्या स्वधीन करतं
आणि एका शुभ्र दिवसाची स्वप्नं पाहू लागतं.
ह्या ओळी उल्लेखनीय!
Post a Comment