समाज कितीही पुढारला तरीही स्त्रीवर लादली जाणारी बंधनं अगदी तशीच आहेत. कालानुरुप थोडाफार बदल झाला इतकंच.
बंदिनी
जन्मजात लाभली
बंधने जगातली
कुशीत जरी पहुडली
कोवळी कुमुदिनी
ती एक बंदिनी, ती एक बंदिनी
तरुणाई चिवचिवते
स्वप्नी पंख पसरते
जनकाच्या परी सदनी
पराधीन नंदिनी
ती एक बंदिनी, ती एक बंदिनी
सप्तपदी चालता
जोडवी हासती
नजरकैद कुंकवाची
असून हृदयस्वामिनी
ती एक बंदिनी, ती एक बंदिनी
सांजकाली जीवनी
पुत्र सुकाणू धरी
पुनश्च वाट चालते
पायी बेडी घालूनी
ती एक बंदिनी, ती एक बंदिनी
जयश्री
1 comment:
खरेच आहे! 'स्त्री ही बंदिनी'! कुठल्या ना कुठल्या नात्यात अडकली असते.
तसे पहायला गेले तर कोण स्वतंत्र असते?
गदिमांनी म्हटलेले आहे "जग हे बंदीशाला,जग हे बंदीशाला,कुणी न येथे भला चांगला जो तो पथ चुकलेला.
ह्या बंदीशालेत सगळेच बंदी आहेत.
कविता आवडली.
Post a Comment