आयुष्य
आयुष्य म्हणजे काय असतं...?
देवानी जन्माला घातलं म्हणून काय जगायचं असतं?
खरं तर... आयुष्यातलं बालपण मिरवायचं असतं
आणि तरुणपण टिकवायचं असतं
माणूसपण जोपासायचं असतं
दुसर्यांना हसवत स्वत:ही फ़ुलायचं असतं
पहाटॆच्या दवबिंदूत नहायचं असतं
प्राजक्ताच्या मोत्यांना टिपायचं असतं
रातराणीच्या झुळूकींनी मोहरायचं असतं
निसर्गाच्या श्रीमंतीत वावरायचं असतं
स्वत:चं राजेपण स्वत:च घडवायचं असतं
मित्रमैत्रीणींना जोडायचं असतं
त्यांच्या सुखदु:खात हसायचं आणि रडायचं असतं
आयुष्याच्या मैफ़िलीत बेधुंद गायचं असतं
प्रत्येक गाण्यात वाहून जायचं असतं
अंतरीच्या रागांनी आयुष्य आलापायचं असतं
आणि एका दमदार भैरवीनी संपवायचं असतं.
जयश्री
3 comments:
आयुष्य ही कविता छान वाटली. धन्यवाद!
अभिजित, तुझ्या ह्या प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.
अंतरीच्या रागांनी आयुष्य आलापायचं असतं
आणि एका दमदार भैरवीनी संपवायचं असतं.
वा! सुंदर ! आशयगर्भ !
Post a Comment