ओळख जराही
न होती तुझ्याशी
जवळीक
वाटे घडावी तुझ्याशी
लाजून
होते तुझे बोल तेव्हा
भेटीत
होती नव्हाळी जराशी
स्वीकारले
ना कधी बंध कुठले
अनुबंध
केवळ तुझे काळजाशी
स्वप्नातला
गोडवा मी जरासा
ठेवून
घेतो नि जपतो उराशी
भेटीत
असते किती ती असोशी
भेटीत
असते खुमारी जराशी
रस्ता
कितीही निराळा असो तो
घेऊन येतो
तुझ्या उंबर्याशी
विसरून
गेलो उरातील दु:खे
आनंद माझा
तुझ्या कुंपणाशी
भेटीत
करतो खुशामत फुलांनी
नात्यास
करतो मशागत जराशी
होती विरक्ती
मला जीवनाची
आसक्त
झालो पुन्हा जीवनाशी
जयश्री
अंबासकर
५ सप्टेंबर
२०२०
No comments:
Post a Comment