झालाय अनोळखी काहीसा, जागर तुझा मनातला
अन् परका बराचसा, वावर तुझा मनातला
पुन्हा पुन्हा छळतो सवाल... व्याकुळ मनातला
कसा हरवला माझा सखा... माझ्या मनातला
कसा हा सांधायचा दुवा मनातला
कसा पुन्हा बांधायचा पूल मनातला
तूच फक्त काढू शकतोस, किंतु मनातला
तूच फ़क्त पेटवू शकतोस, दिवा पुन्हा मनातला
तुझ्या येण्याने उजळेल... तिमिर मनातला
तुझ्या स्पर्शाने बहरेल... वसंत मनातला
जयश्री
1 comment:
ये ना रे आणि तू असा दोन्ही काव्यं मस्तच जमलेली आहेत.
खरे तर आता शब्दच उरले नाहीत अभिप्राय द्यायला.तुम्हाला कविता प्रसन्न आहे.
तुम्ही आता 'कवितानवाज़'झाला आहात.
प्रमोद देव.
Post a Comment