दाटल्या कंठातूनी ना शब्द काही उमटले
सावळ्या डोळ्यातूनी आभाळ सारे बरसले
पायरव ऐकावयासी, चित्त का आसूसले
उंब-याशी का असे, पाऊल माझे अडखळे
अंगठ्याशी नजर का ही, पदर हाती घुटमळे
मीत मनीचा दारी असता, लाज का ही मज छळे
पापण्यांची ओल सांगे, वेदना विरहातली
शिरशिरी स्पर्शून गेली, अंतरी भेटीतली
लक्ष्य ज्योती उजळती, नयनी अशा का बाव-या
गाली फ़ुलती हास्य कलिका गोजि-या अन् लाज-या
दूर जाता तू सख्या आयुष्य होते थांबले
नव्हतास जेव्हा जवळी तू, जगणेच होते विसरले
जयश्री
3 comments:
Namaskar Jayashree,
tujhyaa shabdaanaa ek muLacheech lay aahe.
tyaach layeet tee vaachaavee laagate.
chhaan, praasaadik rachanaa asataat.
aapalaach,
Dinesh
झकास!तुम्ही तर शब्दप्रभू आहात.अजून काय लिहू.
प्रियकर,नाथ वगैरे भुमिकेतल्या पुरुषाबद्दलच्या प्रेयसी-पत्नीच्य़ा भावना नेमक्या शब्दात मांडल्या आहेत.
प्रमोद देव.
Its very real... and thats what I like about your stuff... one can relate to the feelings instantly... khupach chaan... keep it coming... all the best...
Post a Comment