पालवी
पार वाळलेले एक
झाड होते कोपर्यात
नसे
सभोवती कोणी
नाही
दृष्टीच्या टप्प्यात
कुणी
म्हणाले तोडा रे
नाही
जीव या झाडात
झाड
उगीमुगी होते
थोडी
धुगधुगी आत
कोणी
एकदा बसला
जरा बुंध्याशी थकून
देह
होता शिणलेला
उन्हातान्हात
रापून
आली
सांजेला ही कोण
कांदा
भाकर घेऊन
घास
भरवला त्याला
तिने
जरासा लाजून
तृप्त
झाला जीव त्याचा
गोड
भाकर खाऊन
सारा
कौतुक सोहळा
बघे
झाड ही वाकून
पुन्हा
भेटेन म्हणाली
हरखला
तो मनात
होई
नवी सळसळ
आता
सुकल्या झाडात
एकमेकात
दोघेही
जेव्हा
एकरूप झाली
सरसरुन
तेव्हाच
झाडा
पालवी फुटली
जयश्री
अंबासकर
१.४.२०१८
No comments:
Post a Comment