न परतून येती
अशा मुक्त रात्री
कशाला
हवी शिस्त बेशिस्त रात्री
नवा
गोड अपराध होणार आहे
नको
आज चंद्रा तुझी गस्त रात्री
कशी
नोंद करतेस माझ्या गुन्ह्यांची
सजा
हर गुन्ह्याची कशी फक्त रात्री
इथे
गर्द काळ्या किती संथ रात्री
तिथे
मात्र होत्या तुझ्या व्यस्त रात्री
नव्याने
पुन्हा भेट व्हावी तुझ्याशी
नवे
जागणे अन् नव्या तृप्त रात्री
जयश्री
अंबासकर
३.४.२०१८
No comments:
Post a Comment