Tuesday, November 07, 2006

तू अन्‌ मी

आतूरलेला तू
अ‍न्‌ बहरलेली मी

आसूसलेला तू
बावरलेली मी

कासावीस तू
हरवलेली मी

नादान तू
अजाण मी....

प्रश्नार्थक मी
आश्वासक तू

स्वप्नील मी
हळुवार तू

बेहोष मी
मदहोश तू

स्वानंद मी
बेधुंद तू

हिंदोळा मी
आंदोलन तू

संमोहित मी
संमोहन तू........

अनुनय तू
अनुराग मी

अवाहन तू
अनुमोदित मी

माझाच तू
अन्‌ तुझीच मी

जयश्री

2 comments:

प्रमोद देव said...

मोजक्या शब्दात पण भावनानी ओतप्रोत असे प्रियकर-प्रेयसीचे नाते शब्दबद्द केलेत. आवडले.

tiku said...

little bundle of joy ..loved it the most ..