Wednesday, November 15, 2006

तुझे श्वास

श्वास तुझे ते मला दिलेले
संपत आले रे
कासावीस हा जीव होतसे
त्याविण माझा रे

श्वासांच्या त्या हिंदोळ्यांवर
झुलते मी ही तुझ्यासवे
स्पंदनात त्या अनुभवते मी
तुझ्या छबीचे रंग नवे

हळुवार त्या निश्वासांच्या
गोड गुलाबी स्पर्शाने
लाली चढते गो-या गाली
नकळत कशी ही लज्जेने

उमले ओठी हास्य चोरटे
आठवून त्या गुजगोष्टी
काटा फुलतो अंगावरती
तुझीच स्मरुनी गोड मिठी

रिती जाहले आहे पुरती
विना तुझ्या त्या श्वासांनी
दे ना आता श्वास नवे ते
घेऊनी मजसी तव कवनी

जयश्री

2 comments:

प्रमोद देव said...

विषय तोच पण शब्द नवे.
भावना त्याच पण शब्द नवे.
कसे तुम्हाला रोज एकाच विषयावर एव्हढ्या विविध तऱ्हेने कविता सुचतात?

हे बाकी खरे आहे की रोजच सुर्य उगवतो आणि मावळतो पण प्रत्येक दिवस वेगळाच असतो.तसेच तुमच्या कवितेच्या बाबतीत जाणवते.
सलाम!तुमच्या काव्यप्रतिभेला सलाम!

tiku said...

manapasun avadli hi kavita ..khup chan ahe..