Sunday, November 12, 2006

तुझ्याविना

का रे इतकी बंधनं हवीत ह्या जगाची? कां मनाला हवं तसं जगता येऊ नये? नाही रे जगता येत तुझ्याशिवाय!!

माझं अस्तित्व तुझ्याशिवाय
एक मोठं शून्य
जगातलं सारं काही व्यर्थ
तुझ्याशिवाय अन्य

जाणीव होताच ह्याची मला
कासावीस होतो जीव
तुझ्याविना माझ्या जगण्याची
मलाच येते कीव

कसली ती तगमग
कसली ती तडफ़ड
तुझ्याविना जगण्याची
कशासाठी ही धडपड

उधळून द्यावी सारी
बंधने वाटे आज
भिरकावून द्यावी ती
पांघरलेली लाज

धावत तुझ्याकडे येऊन
मनसोक्त रडून
सारं काही करावं मोकळं
कुशीत तुझ्या शिरुन.

जयश्री

1 comment:

प्रमोद देव said...

मस्त!एकाच विषयावर(बंधन,प्रेमसमर आणि तूझ्याविना) एव्हढ्या विविध तऱ्हेने कविता करता येतात हे मी ऐकून होतो;पण एकच व्यक्ती हे इतक्या समर्थपणे करू शकते हे माहित नव्हते. तुमचे कल्पनावैभव आणि शब्द सामर्थ्य अफाट आहे.तुम्हाला माझा मानाचा मुजरा!