आसवांचा कोणता व्यवहार झाला अन सुखाचा केवढा भडिमार झाला बोलली ती हसुन थोडी मोकळी अन जग म्हणाले “काय हा व्यभिचार झाला”
नववधूचे खूप त्याने हाल केले
होय त्याचा तो अता अधिकार झाला
श्रेष्ठ कुठला देव ह्याचा वाद होता
त्याच मुद्द्यावरति हिंसाचार झाला
एकदा त्याने भितीने साथ केली
अन गुन्ह्याचा खुद्द भागीदार झाला

११ मार्च २०२१
No comments:
Post a Comment