वंशमणी मात्रा वृत्त - ८ ८ ४
अभिमानाने
आव्हान तिला त्याचे
मंजूर तिलाही युध्द श्रेष्ठतेचे
सत्ताच पाहिजे होती दोघांना
प्रतिस्पर्धी झालेत एकमेकांचे
सामर्थ्य केवढे माझ्या बाहूत
ना टिपूस येतो कधीच डोळ्यात
माझाच वाढतो वंश तुझ्या उदरी
माझेच पारडे झुके तराजूत
नाजूक जरी परि नाही मी अबला
चूल, मूल
इतकाच परिघ ना उरला
घालते गवसणी मी आकाशाला
पारडे झुकावे माझ्या बाजूला
झुंज चालते अविरत ही
दोघांची
तू तू मी मी होते बाचाबाची
होणार कधी जाणिव
दोघांनाही
रथास
असते गरज दोन चाकांची
कधि तिने झुकावे थोडे नरमीने
कधि त्याने घ्यावे जरा समजुतीने
करि सुकाणु घ्यावा
आळीपाळीने
संसार करावा खेळीमेळीने.
जयश्री अंबासकर
वंशमणी वृत्तातली माझी कविता माझ्या आवाजात ऐका !!
तुम्हाला आवडली तर नक्की Like, Share आणि Subscribe करा !
No comments:
Post a Comment