तरही गझल - ह्या गझलेतला मिसरा आहे वैभव
जोशी ह्यांचा "ऋतू येत होते ऋतू जात होते"
ऋतू येत
होते ऋतू जात होते
परी मी
सख्याच्याच ध्यासात होते
अता वाटते
शांतता जीवघेणी
गदारोळ
कारण नशीबात होते
कसा रंग
येईल त्या मैफिलीला
तुझे सूर
सारेच मौनात होते
कशाला
हवी पौर्णिमेची मुजोरी
इथे चांदणे
बाहुपाशात होते
सखा आज
येणार माहीत होते
तसे पूर्ण
संकेत हृदयात होते
तिन्हीसांज
मंदावली का अशी ही
उसासे
तिच्या आज श्वासात होते
इथे स्वैर
सारे, न लज्जा न काही
इथे सर्व
काही बिछान्यात होते
न होते
भिकारी, न लाचार कोणी
तिथे सर्व
अपुल्या रुबाबात होते
कुणाला दिले ना जरा
दु:ख त्याने
जुने भोग त्याच्याहि
स्मरणात होते
जयश्री
अंबासकर
No comments:
Post a Comment