नको जगाकडे बघू
असा
लाचार होऊन
हिस्सा
तुझा सुद्धा आहे
पहा डोळे भिडवून
तुझे
तुला मिळणार
जरा
ठेव हे ध्यानात
नको
घाई घाई करु
नशिबाला
दे उसंत
नको
विसंबू कुठेही
तुझे
काम कर तूच
आल्यावर
योग्य वेळ
भाग्य
शोधेल तुलाच
मनासारखे
आपल्या
नसते
सदा घडत
बसायचे
का म्हणून
मुळूमुळू
रे रडत ?
जीव
ओतून तू तुझे
काम
कर अविश्रांत
तुला
नकार देण्याची
मग
कुणाची बिशाद
नको
करु हाजी हाजी
तू
कोणा सोम्या गोम्याची
तूच
आहेस स्वयंभू
नको
गुलामी कुणाची
जरा बघ रे ठेवून
स्वत:वर तू विश्वास
यश
तुझे तुझ्या दारी
मिरवेल
हमखास
जयश्री
अंबासकर
२६.६.२०२०
No comments:
Post a Comment