दुबळ्या
मनाचा, आक्रोश काळा, थांबेल केव्हा
सूर्यात
माझ्या, पेटून वणवा, उजळेल केव्हा
मार्गात
होते, काटेच काटे, जखमाच जखमा
हळुवार
फुंकर, कोणी तयावर, घालेल केव्हा
कुठली
न आशा, होती निराशा, पदरात माझ्या
भाग्यातले
हे, दुष्चक्र माझे, संपेल केव्हा
आभाळ येते,
भरुनी पुन्हा पण, कोसळ न त्याला
माझा सुगंधी,
मनमोगरा मग, बहरेल केव्हा
उलटेच
फासे, पडतात कायम, खेळात माझे
माझ्या
नशीबी, आहे किती हे, उमजेल केव्हा
कसदार
असुनी, माझे बियाणे, पिकते न काही
शेतात
माझ्या, सुख मोतियाचे, उगवेल केव्हा
जयश्री
अंबासकर
No comments:
Post a Comment