नव्या वर्षाच्या नवसूर्याचं तेज
नव्या, विचारी, संस्कारी पिढीच्या हातात
ठरवायचं सगळं तुम्हीच
दुबळे, षंढ बाहु की जोर मनगटात
भ्रष्टाचाराच्या गर्तेत भिरभिरायचं
की पेटवायच्या उत्कर्षाच्या मशाली
ठरवायचं सगळं तुम्हीच
सार्या दुनियेचं भवितव्य आहे तुमच्या हवाली
जुन्या रुढी, परंपरांचं काळं खिन्न आभाळ
की नव्या विचारांची सुंदर, रंगीत सकाळ
ठरवायचं सगळं तुम्हीच
इतिहासाची दलदल की भविष्याची विजयी माळ
पेटून उठायचं अन्यायाच्या ठिणगीतून
की बसायचं पाठीचा कणा मोडून
ठरवायचं सगळं तुम्हीच
उठा....आता चालणार नाही फार उशीर करुन
जयश्री
2 comments:
छान आहे! याच विषयाशी संबंधित कविता मागच्या न्यू ईयरला (२०१२) मी माझ्या ब्लॉगवर टाकली होती. हि कविता India Against Corruption ला ईमेलने पाठवली होती जी त्यांनी त्यांच्या फेसबुकवर प्रकाशित केली होती. तुम्हाला विनंती तुमची कविता सुद्धा त्यांना शेअर करावी. ईमेल पत्ता - iac.pune@gmail.com
सलाम सरत्या वर्षाला… 2011
दिलेस तू सामर्थ्य आणि विश्वास, तेव्हा लढलो आम्ही भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध
दिलीस विचारांची ताकद, तेव्हा ओळखू शकलो सरकारची अयोग्य नीती
दिलेस तू Social Network चे हत्यार, तेव्हा भाग पाडले आमची मते ऐकण्यास
दाखवलीस नवी दिशा, तेव्हा वाटले नक्कीच येणारे वर्ष घेऊन येईल उज्वल भवितव्य
स्वागत नव्या वर्षाचे… 2012
संघटीत होऊन समाजकार्यासाठी झोकून देण्यास युवाशक्ती आता सज्ज
भ्रष्टाचारमुक्त भारत आमच्यासाठी यापुढे स्वप्न नव्हे वास्तव
या लोकशाहीची जनता खरी मालक हि खुणगाठ बांधून पक्की
मतांचे मोल जाणून नव्या वर्षात खरया लोकनायकाची निवड आता नक्की
माझा ब्लॉग http://amolmd.wordpress.com/
धन्यवाद अमोल :)
तुझ्या कविता फार सुरेख आहेत !! नव्या पिढीच्या भावना फार प्रभावीपणे व्यक्त केल्या आहेस !!
Post a Comment