Friday, April 13, 2007

सारे तुझ्यात आहे

आभास चांदण्याचा या लाजण्यात आहे
जे जे मला हवेसे सारे तुझ्यात आहे

तेजाळती कशा या बंदिस्त दोन ज्योती
ही आगळी दिलेरी तव काजळात आहे

ह्या सावळ्य़ा मुशीचे सौंदर्य जीवघेणे
जादू परी तुझी या साधेपणात आहे

स्वीकारुनी गुलामी बेचैन रात आहे
चंद्रात आज माझ्या ही खास बात आहे

संकेत हे गुलाबी, आवेग हा शराबी
केसात माळलेल्या या मोगर्‍यात आहे

ही आग मारव्याची ह्या गारव्यात आहे
गाफ़ील यौवनाची संपूर्ण मात आहे

जयश्री

12 comments:

प्रमोद देव said...

गजल जमायला लागली की हो. ही गजलही 'अवि'स्मरणीय वाटतेय.येऊ द्या अजून अशाच छान छान गजला.

तेजाळती कशा या बंदिस्त दोन ज्योती
ही आगळी दिलेरी तव काजळात आहे

ह्या सावळ्य़ा मुशीचे सौंदर्य जीवघेणे
जादू परी तुझी या साधेपणात आहे


हे शेर विशेष आवडले.
प्रमोद देव.

HAREKRISHNAJI said...

mast

HAREKRISHNAJI said...

नवीन काय ?

Vaidya Aparna S. Pattewar said...

khupach chan ahe.

Mrugjal said...

kiti veLa chaan mhanayach^ ??
mhanun mi bolatach nahi....

जयश्री said...

तहे दिलसे शुक्रिया.....!! असंच प्रेम असू द्या.

Anand Sarolkar said...

Adnyatwas kadhi sampnar ahe? ;)

जयश्री said...

आनंद , अरे मी सुद्धा वाट बघतेय रे :)
येतेय लवकरच. सध्या एका वेगळ्याच आणि महत्वाच्या कामात गढलेय ......!!
छान वाटलं तुझी कॉमेंट वाचून. आपल्या लिखाणाची वाट कोणीतरी बघतंय ही जाणीव खूप खूप आनंद देते.....!!

Anand Sarolkar said...

Welcome Back! somehow I am not able comment on your wordpress Blog. So commenting on this Blog.

Dhulicha Vadal mhatla ki mala Sachin ani Sharjah athavta! :)

priyaaa said...

hi....namaskar!
farach chhchan....

Kamini Phadnis Kembhavi said...

ह्या सावळ्य़ा मुशीचे सौंदर्य जीवघेणे
जादू परी तुझी या साधेपणात आहे>>>क्या बात है:-)
मला हे असं नाजूक साजूक शब्द वापरण कधी जमणार ??

tiku said...

hello jaishree just went thru all your poems songs ..and all i can say is ..tu mala nishbd kela .mala changli marathi yet nahi ga savay nahi ahe pan arth samzta mala ..ani khupas anandani maan bharla ..congrats for all the gudwork that you are doing ..keep sharing with us ..lots lv n gudwishes .do visit my blog some time .tikuli