Saturday, April 07, 2007

मोहर नात्याचा

मोहर नात्याचा

का गुंतत जातो आपण
नात्याच्या गुंत्यात
का आवळत जातो गाठी
अपेक्षांच्या बंधनात

नात्याचा हा नाजूक बहर
कोमेजत जातो नकळत
अपेक्षांच्या ओझ्यानं
झडत जातो नकळत

नातं मनसोक्त फुलू द्यावं
रानफुलासारखं
मोकळं त्याला विहरु द्यावं
स्वच्छंदी पाखरासारखं

नाती नकोत मौसमी
भूछत्र्यांसारखी
कायम हसत बहरावी ती
गुलमोहरासारखी

नकोत फुलं भरमसाठ
नात्याच्या ताटव्यात
डौलदार तुरे मात्र
हमखास असावे त्यात....!

जयश्री

1 comment:

प्रमोद देव said...

कवितेपेक्षा हे जास्त करून स्वगत वाटतंय!फक्त कवितेच्या स्वरूपात मांडलेले आहे.मात्र संपूर्णपणे पटेश!

प्रमोद देव.