Valentine's Day Special :)
मागे वळता दिसते जेव्हा
संसाराची चौकट हसरी
नकळत होते कशी अचानक
पापण्यांची या झालर भिजरी
आठवणी नव नवलाईच्या
लख्ख काही अन् काही पुसटशा
काही गाफिल, सावध काही
चुकार अन् लडीवाळ जराशा
कधी उतावीळ, कधी अनावर
शांत डोह कधी उगाच डचमळ
आवरतांना सावरतांना
सैरावैरा उठते मोहळ
आठवात त्या भिजतांना मग
काळ जरासा थांबून जातो
तुझ्यासवे या जगण्याचा मग
उत्सव होतो... उत्सव होतो.
जयश्री अंबासकर
2 comments:
मनापासून धन्यवाद यशोधन :)
Post a Comment