दाव तोच जीवना लावतो पुन्हा पुन्हा
जिंकतो नि हारतो खेळतो पुन्हा पुन्हा
हर गुन्ह्यात मी तुला पाहतो पुन्हा पुन्हा
दाखल्यात बोलणे टाळतो पुन्हा पुन्हा
चांदणे कधी कुण्या अंबरास भार ना
चंद्र मग उगाच का हरवतो पुन्हा पुन्हा
आसवे न ढाळली मी कधीच पांगळी
का तिच्यापुढेच मी भेकतो पुन्हा पुन्हा
माज ही जुनाच शिरजोर आज ती पुन्हा
आग तीच मी परी पोळतो पुन्हा पुन्हा
हां...कबूल दुश्मनी जन्मजात लाभली
बांध घालुनी दुवा सांधतो पुन्हा पुन्हा
हात जोडुनी उभे सौख्य मजपुढे सदा
व्यर्थ दशदिशात मी शोधतो पुन्हा पुन्हा
जयश्री
3 comments:
जिथे जिथे गजल मिळेल तिथे वाचून मी गजल बद्दल शिकत असते त्यात तुझ्या गजलांचा पण समावेश निश्चित आहे.. असेच गजल लेखन करीत रहा जेणेकरून माझ्यासारखी शिकत राहू शकेल...
झक्कास एकदम... मज़ा आया... आपके क्या कहने...
दीपिका
चांदणे कधी कुण्या अंबरास भार ना
चंद्र मग उगाच का हरवतो पुन्हा पुन्हा
शेर आवडला
दीपिका, बंड्या....खूप खूप धन्यवाद :)
Post a Comment