Wednesday, March 17, 2010

हिरवा साज


रिमझिम बरसतो सखा साजण पाऊस
साज घेऊन हिरवा, येतो साजण पाऊस

तिची प्रतिक्षा ओलेती अन सखा ही आतूर
पानापानात शहारा, कणाकणात अंकूर

हिरवाईचे डोहाळे तिचे पुरवतो सखा
खुळावते राणी कशी साज लेऊन अनोखा

मिरविते नवा शालू भरजरी तो हिरवा
प्रेमसरीत भिजूनी चढे रंग गाली नवा

मेघ दाटती नभात तिचे बघण्या कौतुक
हलकेच उतरती, घेती चुंबन नाजुक

तीट लावियतो गाली, वारा हळूच वाकून
शेला फुलांचा रंगीत, धरा घेते पांघरुन

जयश्री

6 comments:

माऊ said...

अप्रतिम !!!

जयश्री said...

शुक्रिया जानेमन :)

smita said...

apratim apratim aptratim....:)

दीपिका जोशी 'संध्या' said...

तुमचे काय विचारता बॉ.. आमचे स्फूर्तिस्थान... उत्कृष्ट असतात सगळ्याच तुझ्या कविता...

दीपिका...

Sandeep said...

अप्रतिम

जयश्री said...

स्मिता, दीपिका, संदिप........खूप छान वाटलं तुमचे कौतुकाचे शब्द बघून :)