Tuesday, March 09, 2010

भग्न किनारे


का उदास वाटते
नयनी पाणी दाटते
असून घोळक्यातही
एकलेच वाटते

बोलणे नको नको
मौन सुखद वाटते
विचारही मनी नको
रितेच मुक्त वाटते

शांत सागरातही
भोवरे नवे नवे
वादळे जुनी परी
भग्न किनारे नवे

उजाड माळरान हे
गंध, गारवा नको
श्रावणातही घना
बरसणे तुझे नको

जयश्री

2 comments:

◄♪♫ संदिप पाटील ♫♪► said...

याच मनस्थितीत गेल्यावर कवितेचा खरा अर्थ कळतो

जयश्री said...

खरं आहे तुझं :)