Saturday, February 27, 2010

रुजवू मराठी, फुलवू मराठी


हे मी लिहिलेलं आमच्या कुवेतच्या महाराष्ट्र मंडळाचं अस्मिता गीत. आज मराठी दिनानिमित्त मुद्दाम ब्लॉगवर टाकतेय.

गीत - जयश्री अंबासकर
संगीत - विवेक काजरेकर
गायक - विवेक, जयश्री

इथे आपल्या ला ऐकता येईल.

http://maharashtramandalkw.org/index.php?option=com_content&view=article&id=41&Itemid=93&lang=en



हर दिलाची एक बोली
मी मराठी, मी मराठी
रुजवू मराठी, फुलवू मराठी

ह्या कुवेती वाळवंटी
रुजवू हिरवळ, ही मराठी
आसमंती गर्द काळ्या
चांदणे फुलवू मराठी

सोडुनी आलो जरी प्रिय
मातृभूमी आपुली
दूरदेशी तरीही आपण
जगवूया अपुली मराठी

लीन होऊन आज वंदू
मायभूमी आपुली
पांग फेडू याच जन्मी
जिंकवू अपुली मराठी

5 comments:

milind kulkarni said...

I was the first one to present it on the stage. Without singing - just by miming!!! Well I am proud to be part of this event in the Maharashtra Mandal.

जयश्री said...

हो रे मिलिंद....तू आणि संगीताने एकदम मस्त present केलं होतं. आमच्या गाण्याला "अस्मिता गीता"चा मान तुमच्या हातूनच मिळाला :)

Unknown said...

Jayu - Vivek ,

Dhanya aahaat tumhi.... amhaalaa tumchaa abhimaan aahe ..

विजय शेंडगे said...

तुमची गझल अगदी मनापासून आवडली.

जयश्री said...

विजय......तहे दिल से शुक्रिया :)