Sunday, March 22, 2009

अशक्य केवळ


तुझाच वावर मनात केवळ
निभाव आता अशक्य केवळ

नको अता ही उगाच जवळिक
पुन्हा मनाचे दुभंग केवळ

तुझ्यामुळे ही फितूर गात्रे
अता गुलामी तुझीच केवळ

तुझी जराशी झुळूक यावी
कसे जगावे उन्हात केवळ

नको नव्याने तुझी उधारी
हिशेब नव्हते हिशेब केवळ

जयश्री

5 comments:

भानस said...

Hey Jayshree,
khoopach chaan, aawadli. Khaas karun
नको अता ही उगाच जवळिक
पुन्हा मनाचे दुभंग केवळ
नको नव्याने तुझी उधारी
हिशेब नव्हते हिशेब केवळ
he donhi jasti chaan.

Prasanna Shembekar said...

नको नव्याने तुझी उधारी
हिशेब नव्हते हिशेब केवळ

good!!

PRAMOD said...

नको नकोची आर्त आर्जवे
साद घालती तुलाच केवळ

Unknown said...

गेले दोन दिवस ब्लॉग वचत होतो (वाचत आहे, पुर्ण व्हायचा आहे अजुन...), पण प्रतिसाद देन्याचे भान नव्हते... मी गझल तसे वाचलेत, पण ’ळ’ सारखा शब्द यमकात आणनारे कमीच आहेत. मस्त वाटले वाचुन... आवडलेला शेर खाली लिहित आहे.


नको नव्याने तुझी उधारी
हिशेब नव्हते हिशेब केवळ



शिर्षक हि मस्तच आहे एकदम...
"गूढ माझ्या मनीचे..."

Yogi... Yo Rocks.. !! said...

khup sundar !! ashaky keval ! :)