का वाटतं इतकं निराधार.......
शब्दांशिवाय....
ते सुद्धा मुद्दाम करतात अडवणूक
जाणूनबुजून....
मला हतबल होताना बघून,
विजयोन्मादानं अधिकच उधळतात
त्यांना गोळा करण्यातच थकायला होतं
हातात आलेल्या चार-पाच शब्दांचीच जुळवाजुळव करावी तर....
तेच अंगावर येतात
मी गुदमरते....
याचकासारखी हात पसरते
भीक नकोय....
माझेच हवेत मला
....
..
पण माझ्या दुबळ्या हाकेला दुर्लक्षून
ते सरळ निघून जातात
आणि मी ....
मी रहाते तशीच उपेक्षित !
नि:शब्दातून व्यक्त व्हायची सवय करायला हवी आता....
जयश्री
4 comments:
मस्तच
"नि:शब्दातून व्यक्त व्हायची सवय करायला हवी आता...." hee oL khup aawaDali
विजयोन्मादानं अधिकच उधळतात
त्यांना गोळा करण्यातच थकायला होतं
हातात आलेल्या चार-पाच शब्दांचीच जुळवाजुळव करावी तर....
तेच अंगावर येतात
khup chan aahet ya oli !
Post a Comment