हुंदका साधा तुझा सांगून गेला
झाकलेली वेदना बोलून गेला
पाहुनी तव लोचनी आभाळ काळे
अंतरी
पाऊस का बरसून गेला
सावरु
मी हा कसा संसार माझा
मांडलेला
डावही उधळून गेला
प्रीत
माझ्या अंगणी बहरेल कैसी
कोवळा
मनमोगरा करपून गेला
ओळखीचे
हास्य तो विसरुन गेला
राहता
तो ही दुवा निखळून गेला
वावडे
होते जरी मैफिलीचे
सूर
का मग आगळे छेडून गेला
मी
अशी दुबळी पुन्हा त्याच्यासमोरी
चेहरा
संपूर्ण तो वाचून गेला
वाट
माझी राहिली अंधारलेली
तो
स्मृतींचे काजवे उजळून गेला
जयश्री
अंबासकर
३०.३.२००७
8 comments:
मस्त!!!!!!!!!
ओळखीचे हास्य तो विसरुन गेला
राहता तो ही दुवा निखळून गेला
हा शेर तितकासा जमला नाही. पुन्हा एकदा लिहायचा प्रयत्न करा!
बाकी सगळे शेर लाजबाब!!!
no further post ?
वा वा क्या बात है गुरु शायरी पे शायरी किये जा रहे हो.. काही मार्गदर्शन तरी करा...
कवीता का झाली बरे अशी अबोल ?
really good heart touching try,
want to share
Where have you been for such along time?
I thot u left the blogosphere...
newways..nice to see you back..
Ani ho..." Diwalichya Hardik Shubhechha"
Atishay sundar aarthpurna shabda!
थोडा उशीरा अभिप्राय देतो आहे,
पण ही छान गझल इथेही दिसते आहे..
http://samwad.multiply.com/reviews/item/27
शुभेच्छा !
Post a Comment