मन म्हणजे काय हे अजून कोणालाच उमगलेलं नाहीये. प्रत्येकाचं मन वेगळं ! पण कशाला हवा तो खटाटोप मनाला जाणून घ्यायचा....? मनाच्याच रंगात रंगून जाऊन....... मस्तपैकी आयुष्य रंगीत बनवायचं :) अजून काय....!
मन उनाड पाखरु
त्याची कशी भिरभिर
उडे क्षणात नभात
कधी सूर पाचोळ्यात
मन मोठं सुपापरी
कधी ससा तो सानुला
कधी आकळे सकला
कधी नाकळे कुणाला
मन रंगांची भिंगरी
खुले इंद्रधनुपरी
कधी उदास एकली
भासे सावळी सावळी
सोडवावे कशाला हे
कोडे मनाचे मनाचे
न्हावे रंगात तयाच्या
गीत गावे त्या रंगाचे
जयश्री
3 comments:
वा!!!
मन वढाय वढाय ची आठवण झाली
सोडवावे कशाला हे
कोडे मनाचे मनाचे
न्हावे रंगात तयाच्या
गीत गावे त्या रंगाचे>>>>ये पटेश एकदम :)
खरेच आहे श्यामलीजींचे! आपण बहिणाबाईंच्या ठशाची कविता लिहिलेय. लगे रहो.
प्रमोद देव.
म्हणुन तर रामदास स्वामि मनाचे sholaka (कसे लिहायचे?) लिहितात.
मना सज्जना
Post a Comment