Sunday, February 18, 2007

प्रीत

प्रीत हुरहुर
प्रीत काहुर
हरखली प्रीती

प्रीत आठव
प्रीत आर्जव
मोहरली प्रीती

प्रीत दुखरी
प्रीत हसरी
बहरली प्रीती

प्रीत वेदना
प्रीत सांत्वना
रुजली ही प्रीती

प्रीत कातळ
प्रीत वादळ
शहारली प्रीती

प्रीत अपेक्षा
प्रीत उपेक्षा
कोमेजली प्रीती

प्रीत मृगजळ
प्रीत हळहळ
कळली ना प्रीती

जयश्री

4 comments:

HAREKRISHNAJI said...

छानच आहे

Anonymous said...

वा!छान!

प्रीती सुरी दुधारी,निशीदिनी सलते जिव्हारी
सुखवी जिवास भारी....हे पद आठवलं!

प्रमोद देव.

श्यामली said...

शेवट्च कडव खास :)

HAREKRISHNAJI said...

नवीन काही