Tuesday, October 17, 2006

मी पण

माझे मी पण मी कधीच विसरले
सवे जेव्हा तुझ्या मी पहिल्यांदा बहरले

स्पर्शातून तुझ्या रे मोरपीस फुलले
मनातले तरंग सारे अधरांवर उमटले

सारं विश्व माझं व्यापून तू टाकलंस
मला मात्र पुरतं वेडं करुन सोडलंस

सूर्य, चंद्र, तारे, आकाश सारं काही तूच
हृदयातली छेडली जाणारी हर एक तार तूच

तुझ्यापासून सुरु आणि तुझ्यापर्यंतच सारं
वृथा आता माझ्यासाठी बाकी जग सारं

जयश्री

1 comment:

प्रमोद देव said...

ही कविता देखिल आवडली.(प्रेरणास्थान=श्री.अंबासकर!)
शब्द अगदी तोलून मापून वापरलेत.अजून लिहा.