कायदा गुन्ह्यासवे जुंपणार आजही
काल वाकला तसा, मोडणार आजही
मारणार तोच अन्, तोच तारणारही
का पणास द्रौपदी, लागणार आजही
भरभरुन
सौख्य तू कैकदा दिले मला
जीर्ण
पोतडी पुन्हा फाटणार आजही
वायदा करुन
तू, तूच तोडणार तो
कायदा
तुझा पुन्हा चालणार आजही
जाहला
भल्याभल्या पुत्रमोह कालही
इंद्र
कवचकुंडला मागणार आजही
जयश्री
अंबासकर
1 comment:
apratim !
Post a Comment