संभल जा जरा .......
आभाळ दाटलेलं
पावसाने जडावलेलं
रस्ता थांबलेला
जरासा सुस्तावलेला
आळस भिनलेला
गारठा वाढलेला
एकांत कंटाळलेला
घरात दडलेला
कॉफीत दरवळलेला
आठवणींनी वेढलेला
कासावीस झालेला
चाहुलीनं मोहरलेला
सरींनी भिजलेला
काचेवर ओघळलेला
खुदकन हसलेला
स्वप्नात हरवलेला
……
….
ए दिल…….. संभल जा जरा……… फिर मुहोब्बत करने चला है तू 
1 comment:
सुंदर!
Post a Comment