न काट्यास कळले सलावे कुठे
रुतावे कुठे अन् दुखावे कुठे
विषाला अता या उतारा नको
कळे पूर्ण त्याला भिनावे कुठे
बरसता जमावे तळे लोचनी
असे पापण्यांनी झरावे कुठे
उरी वेदना, हास्य गालावरी
अशा सोसण्याचे पुरावे कुठे
तिरस्कार झेलून थकलो अता
अशा गुंतण्याचे निभावे कुठे
तुझे चांदणे गोंदले या नभी
निशेच्या नशेने वहावे कुठे
सुरांनी तुझ्या कोसळावे पुन्हा
असे श्वास द्यावे नि घ्यावे कुठे
अवेळी कसा लोपला सूर्य हा
रित्या अंबराने लपावे कुठे
जयश्री
6 comments:
वॉव...सुंदर...तुमचे काय विचारता बॉ.. उगीच दोन ओळी लिहीतेय...मला गजल मधले फारसे कळत नाही..शिकतेय...तरी पण... चुकले असलेले ठीक करून समजावून सांग... कृपा करून... मात्रांचा लोचा जरूर आहेच.. हेहे...
शब्दांचा झरा हा कसा वर्णावा
अशा ह्या जलाने वहावे कुठे
दीपिका
Apratim ! Baki kahi shabda nahit.
सुरेख !!!
Bahut sundar
Surekh..
यहे दिल से शुक्रिया यारो !!!!!!!
Post a Comment