Thursday, April 23, 2009

मन हळूच गाली हसले


अचानक इतका छान, गोड वारा सुटला ना.....  मनात खट्याळ  हसू उमटलं.... आणि मग...........

हा सुटला अल्लड वारा
मन पाकोळीगत झाले
रोमांचित काया सारी
मन हळूच गाली हसले

हे रंग मनाचे सारे
आकाशी कसे उमटले
जाणून गुपित ते गहिरे
मन हळूच गाली हसले

चाहुल खट्‍याळ कुणाची
मन अधिर अधिर का झाले
पाहून कपोली लाली 
मन हळूच गाली हसले

आतूर मनाला सावर
कानात कोण कुजबुजले
नजरेची बघुनी भिरभिर
मन हळूच गाली हसले

लाजून चिंब भिजलेले
मन हिंदोळ्याचे झाले
आंदोलन घेता बुजरे
मन हळूच गाली हसले

जयश्री


6 comments:

अरविंद said...

खूप सुंदर कविता ....

शब्द सितारे... said...

aapl likhaan khup changla ahe

please remove word verification on your coment.

preeti_lk said...

kharach hya navin jayashree la bhetun mann krita krita zale....Hey ishwara ashi bahumukhi pratibha mazya jeevanat aali tya saathi dhayavaad...ashich khulat raha fulat raha...shubhechchhaa..
preeti

यशवन्त नवले said...

जयश्रीजी! नमस्कार!
कविता खूप आवडली.
"एका छोट्या स्मितहास्याने तुम्ही हे जगसुद्धा जिंकू शकता असा माझा विश्वास आहे." ---- वा!! पूर्ण सहमत

◄♪♫ संदिप पाटील ♫♪► said...

आत्ताच कुठे या ब्लॉग वरच्या कविता वाचायला सुरुवात केलेय आणि एकास एक अप्रतिम कविता आहेत, खरच "सारे तुझ्यात आहे " प्रमाणे याही कवितांवर लवकरच अल्बम प्रसिद्ध होईल हि अपेक्षा ...

--
◄♪♫ संदिप पाटिल ♫♪►
♥ ♦ मुंबई ♣ ♠

जयश्री said...

अरविंद,Truth or Dare, प्रीती, यशवंत, संदिप..... मनापासून धन्यवाद !! तुमच्या प्रोत्साहनाने माझा उत्साह अजून वाढला..... :)