असाच तो अधून मधून जेव्हा डोकावतो मनात......तेव्हा मनातल्या भावना वेगळ्याच रुपानं बाहेर पडतात....
घुमे रानशीळ गोड कशी पानात पानात
फुले चांदणे गुलाबी कसे मनात मनात
लागे चाहुल तयाची मन आतूर आतूर
उरी गोड थरथर, लाज करी चूर चूर
कुणी उकलले माझे आज गुपित गुपित
फुले चांदणे गुलाबी कसे मनात मनात
आठवांचे सोनसळी, ऊन केशर केशर
तुझ्या वनात बसंती, मन मोहर मोहर
गाणे गाई वारा तुझे माझ्या कानात कानात
फुले चांदणे गुलाबी कसे मनात मनात
दिस भुलाव्याचे कसे, जाती छळत छळत
नादावले कशी बाई तुझ्या खेळात खेळात
न्हाऊनिया झाले चिंब तुझ्या रंगात रंगात
फुले चांदणे गुलाबी कसे मनात मनात
जयश्री
6 comments:
hmmmm. . . nice. Chandane Gulabi!!! A cute song.
अहाहा! एकदम मोरपिस! हळुवाऽऽर कविता!!
प्रत्येक ओळीत शेवटचे शब्द दोन वेळा आल्यामुळे ताल मस्त साधला आहे. :-)
surekh
चांदण हे पुनवेच कस टिपुर टिपुर
भरतीच्या लाटांनी हे मन झाले सैर भैर!
वा. सुंदर कविता आहे. अभिनंदन.
Post a Comment