Wednesday, September 22, 2021

वृत्त - मंदारमाला

वृत्त - मंदारमाला गागाल गागाल गागाल गागा, लगागा लगागा लगागा लगा दाटून कंठात येतो उमाळा पुन्हा पापणीभार होतो रिता आभाळ होते जरा मोकळेसे ढगातून सार्‍या व्यथा पांगता येती फिरूनी तुझ्या आठवांच्या सरी शल्य घेऊन ताजे पुन्हा दु:खास माझ्या नवा कोंब येतो तजेला जुन्या वेदनेला पुन्हा झाकोळ झाकोळ दाही दिशांना पुन्हा सर्द शून्यात संवेदना अंधार वेढा तनाला मनाला, पुन्हा अंतरी गोठती भावना येते अकस्मात चाहूल जेव्हा मनी जागती जाणिवांचे मळे चैतन्य येते तुझ्या पावलांनी पुन्हा चिंब होते सुखाचे तळे पाशात जुल्मी असा गुंतलो मी तुझी ओढ श्वासात ध्यासात या संमोहनातून बाहेर यावे न वाटे मनाला कधीही प्रिया ओढाळ वेल्हाळ माझ्या मनाला किती आवरू लावुनी शिस्त मी स्वाधीन केले स्वत:हून झालो तुझ्या चक्रव्यूहात बंदिस्त मी जयश्री अंबासकर ही कविता तुम्हाला इथे ऐकता येईल




Saturday, September 11, 2021

बाप्पा आले

बाप्पा आले... !!

गीत आणि सादरीकरण - जयश्री कुलकर्णी अंबासकर
Editing - Adwait Ambaskar
Artwork - Bhushan Sable
Rhythm Track - Kishore Musical Ongole's Collections

हे बालगीत तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर ऐकू शकता.