गूढ माझ्या मनीचे !!
ही माझी हसरी आणि स्वप्नाळू दुनिया !!
Monday, December 01, 2008
नवाच तू ... नवीच मी
मनासारख्या जोडीदारासोबत आयुष्याची २२ वर्ष .... अन तरीही नवाच तू...नवीच मी :)
आयुष्य मी गुंफले
भोवती सख्या तुझ्या
स्वर्ग गवसला मला
भोवती सख्या तुझ्या
श्वास तू, मधुमास तू
सोबती हवास तू
तुझ्याविना अपूर्ण मी
आस तू, खास तू
आरंभ तू, अंत तू
गीत तू, संगीत तू
आयुष्य हे चांदणे
फ़क्त सदा हास तू
जयश्री
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)