Monday, April 25, 2022
खेळ मौनाचा
Saturday, April 09, 2022
रामजन्म
Thursday, April 07, 2022
एक सुंदर सांज
Tuesday, March 29, 2022
Friday, March 11, 2022
भेट आहे वादळी
मारली मी
या जगाच्या थाप दारावर
मी तुझ्या
साठीच आलो या नकाशावर
जोवरी होकार
नाही मी न भानावर
लक्ष माझे
बस तुझ्या एका इशार्यावर
जीवघेणा
वार होतो थेट माझ्यावर
मोकळे सोडू
नको ना केस वार्यावर
चुंबण्याचा
मोह होता लाल ओठावर
तीळ होता
द्वाड छोटासा पहार्यावर
भेट आहे
वादळी ना चित्त थाऱ्यावर
भरवसा नाहीच
माझा आज माझ्यावर
जयश्री अंबासकर
Sunday, March 06, 2022
वृत्त - लवंगलता
Tuesday, January 11, 2022
वृत्त - बालविक्रिडीत
Tuesday, January 04, 2022
शिशिरात चालते सत्र मोह-त्यागाचे
शिशिरात चालते सत्र मोह-त्यागाचे
बेभान आर्जवी तृप्त तृप्त सहवास
एकांत लाजरा खुलतो फुलतो खास
लाघवी ओढ पण दुःख पुन्हा विरहाचे
शिशिरात चालते सत्र मोह-त्यागाचे
मोहावर होते जरी मात त्यागाची
अनिवार व्यथा व्याकुळते पानगळीची
लागती वेध सृजनाचे अन फुलण्याचे
शिशिरात चालते सत्र मोह-त्यागाचे
हुरहूर अंतरी असण्याची नसण्याची
चाहूल मात्र पण आत नव्या बहराची
विरहातच रुजते बीज पुनर्मिलनाचे
शिशिरात चालते सत्र मोह-त्यागाचे
जयश्री अंबासकर
Monday, November 15, 2021
वृत्त - सिंहनाद
वृत्त – सिंहनाद
२ ८ २
मी थकलो धावुनिया
अन आलो तुजपाशी
सांभाळ मला देवा
घे कवळुन हृदयाशी
मी धावत का होतो
कळले न मला तेव्हा
मी चुकलो हे कळले
अन वळलो मी तेव्हा
हावरा अती झालो
वखवख सुटली फार
सांभाळू ना शकलो
जड देहाचा भार
नाती गोती सरली
उरले न सवे काही
निष्कांचन होउन मी
आलोय तुझ्या पायी
तो पैलतीर खुणवे
निर्मोही मन आता
बस तुझ्या पावलांची
अनिवार ओढ आता
जयश्री अंबासकर
Sunday, November 07, 2021
वृत्त - मदनतलवार
वृत्त - मदनतलवार
२ ८ ८ ८ ८ ४
(मांडणी १३ ८ ८ ९)
दुनियेत किर्र घनदाट हरवली वाट बिकट हा घाट दिसेना काही
लावले जगाने दार बंधने फार नवा अंधार सुचेना काही
लोटली युगे ना सरे जन्म हा झुरे रिक्तता उरे तेच ते भोग
वाटते पुरे हा त्रास सुखी आभास मुका वनवास फक्त उपभोग
का जुल्मी पुरुषी बळा सोसुनी कळा होउनी शिळा लावणे जीव
देहात नवा ओंकार नको आधार हवा अधिकार नकोशी कीव
रक्तात उसळते गाज सोडुनी लाज उधळते शेज आज सक्तीची
हृदयात पेटते आग जाळुनी बाग अंतरी जाग नव्या शक्तीची
शृंखला जरी पायात टाकुनी कात मी दिमाखात भरारी घ्यावी
लांघुनी शीव थाटात करावी मात नवी सुरुवात उद्याची व्हावी
या कभिन्न काळ्या तटी जरी एकटी परी संकटी तुझा आधार
ऐकुनी तुझी बासरी सख्या श्रीहरी पुन्हा अंतरी वाटतो धीर
जयश्री अंबासकर
