असं
आजकाल वारंवार व्हायला लागलंय
डोळ्यातलं
पाणी जरा जास्तच वहायला लागलंय
दु:खाने तर येतंच येतं पण हल्ली आनंदात सुद्धा यायला लागलंय
कधी
कधी तर निमित्तही लागत नाही…..
डोळे
उगाच वहायला लागतात.
आधी…
कुणी काही बोललं, आवाज चढवला तर यायचं
पण
आता….
बाहेर
खूप छान पाऊस कोसळत असला,
तर
त्याच्या
सरी…. डोळ्यातून सुद्धा ओघळतात.
कधी
तरी सूर्यास्त बघतांना व्याकूळ होऊन,
तर
कधी चांदण्या रात्री चमचमतं चांदणं पांघरुन….
कधी
समुद्राच्या
निशब्द लाटा
तर
कधी आकाशातल्या रंगांच्या छटा
अगदी
काहीही निमित्त पुरतं.
कुणाची
तरी खूप आतून आठवण येते….
आणि
डोळे पाझरायला लागतात.
संध्याकाळी
देवापुढच्या
दिव्यासमोर
परवचा म्हणताना
आणि
तिरंग्यापुढे
राष्ट्रगीत
म्हणताना
तर भरुन येतातच येतात.
मुलांच्या
Achievements असोत
की त्यांच्या आठवणी असोत
डोळे
कायम डबडबलेलेच.
टिव्हीवर
कुणी छान गात असलं तरी भरुन येतात
कुणी
छान बोलत असलं तरी पाणावतात
कधी
काही छानसं वाचलं, ऐकलं, बघितलं की…
सगळंच
धूसर होऊन जातं…..
काय
होतंय माहिती नाही
पण
अताशा असं होतंय खरं !!
……
हल्ली मी
ना…. त्यांच्याशी एक Deal केलंय
आता
मनातले सगळे उचंबळ मी त्यांच्या स्वाधीन करते
मग
पुढे काय करायचं …
हे
त्यांचं तेच ठरवतात.
ओलावतात…
पाझरतात….
बरसतात….
आणि
मी….
आणि
मग मी मात्र दिसते…. कायम हसरी !!!!!!!!!!!
जयश्री
अंबासकर
Monday, September 07, 2020
काय होते अताशा
Friday, September 04, 2020
असोशी
ओळख जराही
न होती तुझ्याशी
जवळीक
वाटे घडावी तुझ्याशी
लाजून
होते तुझे बोल तेव्हा
भेटीत
होती नव्हाळी जराशी
स्वीकारले
ना कधी बंध कुठले
अनुबंध
केवळ तुझे काळजाशी
स्वप्नातला
गोडवा मी जरासा
ठेवून
घेतो नि जपतो उराशी
भेटीत
असते किती ती असोशी
भेटीत
असते खुमारी जराशी
रस्ता
कितीही निराळा असो तो
घेऊन येतो
तुझ्या उंबर्याशी
विसरून
गेलो उरातील दु:खे
आनंद माझा
तुझ्या कुंपणाशी
भेटीत
करतो खुशामत फुलांनी
नात्यास
करतो मशागत जराशी
होती विरक्ती
मला जीवनाची
आसक्त
झालो पुन्हा जीवनाशी
जयश्री
अंबासकर
५ सप्टेंबर
२०२०
Thursday, September 03, 2020
झाला हा परिहास म्हणू
भास म्हणू, आभास म्हणू की आला हा दिन खास म्हणू
काय
म्हणू या सुखद क्षणांना, आला हा मधुमास म्हणू ?
काजळरात्री
कृष्ण तटावर, यमुनेवरती साद पुन्हा
वेड
म्हणावे की हृदयाला कृष्णाचा हा ध्यास म्हणू
विरह
म्हणू की शिक्षा होती अपराधांची त्याच जुन्या
जीवन
झाले पूर्ण म्हणू की झाला हा वनवास म्हणू
ओढ
किती ही, अंतर मिटले रामाचा मी खास जणू
आस
म्हणू की कास म्हणू की, रामाचा मी दास म्हणू
कौतुक
झाले, त्रागा त्यांचा, दोषी होतो मीच जणू
दाद
म्हणू की आयुष्याचा झाला हा परिहास म्हणू
जयश्री
अंबासकर
Sunday, August 23, 2020
तुम भी मान लेते
इन्कार की वजह तो हमसे
भी पूछ लेते
राहे
जरा बदलकर
हमको ही ढूंढ लेते
यादे
हमारी दिल में मेहफूज अब भी होगी
खुशबू
हवा में थोडी उनकी उछाल देते
वो
रात पश्मिनी सी भूले तो तुम ना होंगे
झिलमिल
वही सितारे सपनों में छोड देते
वो
बेरुखी तुम्हारी, वो बेवजह का रुठना
मुसकान
एक प्यारी बदले में भेज देते
बाते
सदा तुम्हारी मनवा ही हमसे लेते
थोडीसी
जिद हमारी कभी तुम भी मान लेते
हम
भी तुम्हारी तरहा बेफिक्र काश होते
थोडीसी
बेवफाई तब काश हम भी करते
इस
जिंदगीसे
रुठकर यू अलविदा कहा क्यू
कुछ
सांस तुम हमारे दिल से उधार लेते
जयश्री अंबासकर
Monday, August 17, 2020
दैवी परिमळ
“माझा भारत” म्हणता केवळ
अणुरेणुत
रुधिराची
सळसळ
सोबत
आहे सांगुन जातो
खांद्यावरचा
स्पर्शहि
केवळ
राहत होते पापी निव्वळ
वास्तू शापित म्हणुनी केवळ
दोन
टपोर्या डोळ्यांवरती
कडक
पहारा करते काजळ
निव्वळ बाष्कळ होते पुष्कळ
शूर निघाला एकच केवळ
मौनातुनही
बोलत होती
त्याच्या
हृदयामधली
खळबळ
घमघमतो
हर प्रात:काळी
प्राजक्ताचा
दैवी परिमळ
कडे
कपारी रोखु न शकती
त्या
ओढ्याची निर्मळ खळखळ
आईपरि ना दिसते प्रेमळ
वडिलांच्या हृदयाची कळकळ
जयश्री
अंबासकर
Saturday, August 15, 2020
किती भोग बाकी असावेत नक्की
किती श्वास द्यावे नि घ्यावेत नक्की
किती श्वास बाकी उरावेत नक्की
कसा काय साबित गुन्हा व्हायचा तो
पुरावे किती स्पष्ट द्यावेत नक्की
झुरावे, झुकावे….गुलामी करावी
अपेक्षा तुझ्या काय आहेत नक्की
न ओळख कुणाची न अनुबंध कुठले
कसे सूर जुळले असावेत नक्की
तुझे बंद डोळे उघडण्यास अजुनी
किती क्रूर अपराध व्हावेत नक्की
असावी किती ओल नात्यात अपुल्या
किती खोल अंकुर रुजावेत नक्की
किती क्लेश देतोस रे पांडुरंगा
किती भोग बाकी असावेत नक्की
जयश्री अंबासकर
Wednesday, August 12, 2020
मी भस्मसात झालो
सौंदर्य पाहुनिया,
मी मंत्रमुग्ध झालो
ते अग्निकुंड होते, मी भस्मसात झालो
इश्कात
मी बुडालो, बदनाम खूप झालो
बदनाम
जाहलो पण, मी नामवंत झालो
जालिम
तिच्या अदा अन्
विभ्रम
किती निराळे
घायाळ
फक्त मी ना, सारेच लुब्ध झालो
अभिमान
फेकुनी मी, आशाळभूत झालो
दारातला
तिच्या मी, लाचार श्वान झालो
आयुष्य
उधळले मी, सारे तिच्याच पायी
वणव्यात
वासनेच्या, मी
बेचिराख झालो
जयश्री अंबासकर
Tuesday, August 11, 2020
Sunday, August 09, 2020
पाझर कितीक सार्या दगडात पाहिले मी
मातापित्यास जेव्हा सौख्यात पाहिले मी
सौख्यास नांदताना सदनात पाहिले मी
त्या मैफिलीत सारे गंधर्व गात होते
ते सोहळे स्वरांचे साक्षात पाहिले मी
आईस रांधताना तादात्म्य पाहिले मी
वात्सल्य त्रिभुवनाचे घासात पाहिले मी
कविता, गझल नि गाणे ऐटीत वाचतो तो
शर शब्द मधुर त्याच्या भात्यात पाहिले मी
साऱ्या चराचरी या, नव-स्त्रोत जीवनाचा
पाझर कितीक साऱ्या दगडात पाहिले मी
वैराण भावना अन् स्थितप्रज्ञ कोरडेपण
निवडुंग रान सारे नात्यात पाहिले मी
जयश्री अंबासकर
१०.८.२०२०
Thursday, August 06, 2020
रुजवात
रिमझिमत नाचत
आली नाजुकशी सर
हलकेच अंतरीची
तिने छेडियली तार
सृष्टी हसली गालात
उगाचंच खुळ्यागत
सारे सारे आरस्पानी
सारे किती स्वप्नवत
लहरत सवे आला
वारा खट्याळ नाठाळ
पसरला आसमंती
मृदगंधी दरवळ
इंद्रधनुची कमान
उमलली आकाशात
मोती माळा ओघळल्या
पानापानात फांद्यात
धरतीचे पावसाचे
पुन्हा हितगुज झाले
भिजण्याचे रुजण्याचे
नवे सोहळे जाहले
जयश्री अंबासकर
६.८.२०२०
